अजूनही 244 मतदारांचा घोळ कायम,यादी भाग क्र 190 चे बीएलओ यांच्या बेजबाबदारपणाला निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन

वणी वार्ता नितेश ताजणे –

गट ग्रामपंचायत लाठी-भालर वसाहतच्या वार्ड ४ पैकी यादी भाग क्र.१९० मधील बी.एल.ओ.च्या कामचुकार प्रणालीमुळे मतदान यादीतील घोळ कायम असून तो थांबणार तर केव्हा? असा प्रश्न दिनांक २१ सप्टेंबर २०२२ ला दिलेल्या निवेदनातून केला असताना प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये लोकसंख्या फुगवण्याचा गोरख धंदा थांबून लोकशाही प्रजासत्ताक प्रणाली येणार तर केव्हा? असा सवाल लाठी ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी केला असून, निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य असे पाऊल उचलले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला.
या विषयी सविस्तर लेखी निवेदन सादर करताना ग्रामपंचायत लाठी -भालर वसाहत येथील स्थलांतरित व मयत मतदारांची नावे दुरुस्तीबाबत ७ जानेवारी २०२२ ला ग्रामसभेचा ठरावासह मयत व स्थलांतरित मतदारांची यादी निवडणूक विभागाला सुपूर्द केली असताना निवडणूक पारदर्शक प्रणालीला जाग न आल्याने २५ जून २०२२ ला ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी व्यक्तिगत रित्या संवादात्मक चर्चा करून निवेदनासोबत मतदारांची यादी भागशह निवडणूक विभागाला पाठपुरावा करून २७ जून २०२२ ला तहसीलदार वणी यांच्या कार्यालयाकडून पत्र काढून बी.एल.ओ.यांना कार्यवाही व अहवाल सादर करण्यातबाबत सूचित केले पण त्या आदेशाला बी.एल.ओ. चंदू पुनवटकर यांनी केराची टोपली दाखवत थंडबस्त्यात ठेवल्याने आजही ते प्रकरण जसे ते असून मतदान लाठी – भालर वसाहत येथील ग्रामपंचायत कार्यालयाचा शासकीय ग्रामसभेचा ठराव करून दिनांक ५ जानेवारी २०२२ ला निवडणूक विभागाला मतदार यादीतील स्थलांतरित व मयत असलेल्या मतदारांची नावे कमी करण्याबाबत ठराव करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून निवडणूक विभागाला सूचित केले होते .ग्रामपंचायत सांसद प्रणालीच्या ध्येय धोरणाचे महत्व तर काय?या नंतर निवडणूक विभागानी नावे कमी करण्याबाबत मौखिक आश्वासन दिले होते.यानंतर ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी व्यक्तिगत रित्या मतदारांची यादी भागशाह निवेदनासाहित निवडणूक विभागाला २५ जून २०२२ ला सुपूर्द केली.त्यावेळी निवडणूक विभागाकडून आश्वासनासह आवक – जावक मध्ये नोंद करून OC देण्यात आली.त्यांनतर निवडणूक विभागाकडून पत्र काढुन दिनांक २७ जून २०२२ ला बी.एल.ओ.यांना कारवाई करण्याबत सूचित करण्यात आले.त्यांनतर निवडणूक विभागाने आधार लिंक प्रणाली कार्यान्वित केली.त्यानुसार चारही भाग यादी क्रमाकातून मतदार संख्या २६०७ मधून स्थलांतरित व मयत असलेले ९८४ इतके नावे कमी होणे अपेक्षित असताना सुद्धा संपूर्ण यादी मिळून आत्तापर्यंत केवळ ७४२ नावे ( फॉर्म न ७ भरून ) कमी झाल्याने दिसून येत आहे .पण अजूनही २४४ नावाचा घोळ कायम आहे.मुख्यत्वे यादी भाग क्र १९० मधील नावे अजूनही कमी करण्यात आली नाही . या भाग यादी क्रमांकाची ज्या बीएलओ कडे असते त्यांनी नावे कमी न करण्याचे कारण काय? आहे.हा सवाल निवेदन करत्यानी केला असून पारदर्शक निवडणूक विभागाचे कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार व कारवाई तपशील उपलब्ध नाही.हा आरोप सुद्धा केला,निवडणूक विभाग याबाबतीत का डोळे झाक का करत आहे.निवडणूक विभागाला वारंवार भेट देऊन बीएलओ यांना भेटून निवेदित केले आहे . पण कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही सदर यादी भाग क्र १९० चे बीएलओ याच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे . त्यामुळे पत्रव्यवहारा पुरते मर्यादित न राहता या मागणीच्या पूर्ततेकरीता बेमुदत उपोषणाशिवाय मार्ग दिसून येत नाही . हीच का पारदर्शक लोकशाहीचे धोरण मागणीला घेऊन येणाऱ्या ८ दिवसात नावे कमी न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे