
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर (नांदेड) – शहरात दि ८ नोव्हेंबर २०२२ रोजी युवा प्रतिष्ठान तर्फे तालुक्यातील महिला वर्गासाठी विविध कॉर्सेस च्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले आहे.
याबद्दल अधिक वृत्त असे क युवा प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे समाजातील अनेक तरुण युवक,युवती,महिला यांना आपल्या मार्फत विविध कॉर्सेस चे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आले आहेत.याच धर्तीवर हिमायतनगर तालुक्यात आपला ही प्रशिक्षण मोहीम राबविण्याचे ठरविले असून याचे उदघाटन दि ८ नोव्हेंबर २०२२ रोजी हिमायतनगर येथे करण्यात आले आहे.या मोहिमे अंतर्गत अनेक गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी युवा प्रतिष्ठान चे तालुका समन्वयक योगेश चंद्रवंशी,युवा मित्र संजय बनसोडे,मा तंटामुक्ती अध्यक्ष अन्वरखान् पठान,वकील वडगावकर मॅडम,आयु.सुभाष दारवंडे,किशनराव बनसोडे,लोकस्वराज्य आंदोलन तालुका अध्यक्ष तथा पत्रकार धोंडोपंत बनसोडे यांच्यासह अनेक महिला,युवती यावेळी उपस्थित होत्या.
