वणी शहरात भारत जोडो यात्रेच्या समर्थनात मशाल रॅली.


वणी:— नितेश ताजणे


संपूर्ण भारत भर भारत जोडो, संविधान बचाओ, साठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ पद यात्रा सुरू केली आहे. ती यात्रा महाराष्ट्रात आली आहे.त्या निमित्ताने वणी शहरात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली.हि मशाल रॅली शासकीय मैदान येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून शासकीय मैदान येथे समाप्त करण्यात आली.
या मशाल रॅलीत कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवक शेकडोच्या संखेने सहभागी झाले होते.