
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
दिनांक 15/11/2022 रोज मंगळवारला राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर प्रमुख पाहुणे मोहन आत्राम सर आयोजक श्रावनसिंग वडते सर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा स्वागत समारंभ पार पडला.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक वर्गशिक्षक श्रावनसिंग वडते सर यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर प्रमुख पाहुणे मोहन आत्राम सर यांनी बिरसा मुंडा यांच्या जिवनावर आधारित सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम मेश्राम सर यांनी केले तर आभार रंजय चौधरी सर यांनी मानले.हा कार्यक्रम वर्ग 5 वीच्या वर्गाकडून आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी,सोबतच विद्यालयाचे जेष्ठ रमेश टेंभेंकर सर,दिगांबर बातुलवार सर,राजेश भोयर सर,मोहन बोरकर सर,विशाल मस्के सर,सौ.कुंदा काळे मॅडम,सौ. वंदना वाढोणकर मॅडम,सौ.स्वाती नैताम मॅडम, वैशाली सातारकर मॅडम,सौ.दिपाली कोल्हे मॅडम,कु.रूचिका रोहणकर मॅडम,कु. अश्विनी तिजारे मॅडम,तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिक कोल्हे बाबू,पवन गिरी बाबू, बाबूलाल येसंबरे उपस्थित होते.
