झरीजामनी तालुक्यात तामिळनाडू, राजस्थान येथील अवैध सावकारांची दादागिरी

तालुक्यात मागील गेल्या काही वर्षापासुन तालुक्यातील मुकुटंबन व वणी येथे राहून तामिळनाडू व राजस्थान येथील अवैध सावकार झरी तालुक्यातील छोटे व्यापारी व आदिवासी शेतकऱ्यांना गावागावांत जाऊन पैसे व चादर ब्लॅंकेटचे वाटप करून अव्याच्या सव्या पैसे लावून पैश्याचा तगादा लावत असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे सततची नापिकी, नुकसान याचामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. झरी तालुका हा पूर्णपणे आदिवाशी बहुल असून तालुक्यातिल बहुतांश आदिवाशी बांधव हे शिवला माथार्जुन या भागा मध्ये वास्तव्यास असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती वर आधारित आहे.येथील आदिवासी बांधव शेती करुणच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, परंतु सततची नापिकी व निसगाँचा प्रोकोप यामुळे आदिवाशी बांधव त्रस्त आहे व याचाच फायदा येथील दलाल, सावकार घेताना दिसत आहे.
तालुक्या मध्ये राजस्थान तामिळनाडू व अनेक राज्यातून सावकार येउन तालुक्यातिल आदिवाशी बांधवाची लूट करतानी दिसून येत आहे. राजस्थान येथील काही व्यापारी या भागा मध्ये काही वर्षा पासून वास्तव्य करीत आहे व ते तालुक्यात ब्लॅकेट, चादर, रेनकोट, कपड़े या व्यवसायाचा नावा खाली ते व्याजाचा धंधा करुण गरिव आदिवाशी बांधवाची लूट करतानी दिसून येत आहे व गावातील काही
छोटे मोठे पुढारी सुधा आपल्या कमिशन साठी त्या व्यापाऱ्याना मदत करताना दिसून यत आहे. काही राजस्थानी सावकार गरजू नागरिकांना २०० रूपयाची ब्लैकेट २००० अशा प्रकारे वस्तु वाटप व उर्वरित पैसे ५०००हजार रुपये देऊन ६५००रुपये व्याजासह घेत असल्याचे दिसुन येत आहे व शेती साठी देऊन त्यांवर काही देड़ी लाऊन वसूली करताना दिसून येत आहे. गरज असल्यामुळे व शेतीत झालेले नुकसान व उर्वरित शेती करण्यासाठी पैसे नसल्यामुळे तालुक्यातिल आदिवाशी बांधव या व्यवसायला बळी पड़ताना दिसून येत आहे व कळत व न कळत त्यांची लूट होत आहे.अशा अवैध सावकारावर कारवाई ची गरज आहे