
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे जळावे लागते या उक्तीप्रमाणे शिक्षक समन्वय संघाचे लढवय्ये 16 ऑगस्ट 2024 पासून होऊ घातलेल्या हुंकार आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे 56 दिवस आंदोलन तेवत ठेवून टप्पा अनुदानाचा कागद हातात घेतल्याशिवाय माघार नाही अशी खून गाठ बांधून शिक्षक समन्वय संघाच्या खांद्याला खांदा , हाकेला हाक देऊन शिक्षक समन्वय संघाचे हात बळकट करण्याचे काम प्रा श्रीकांत लाकडे, (विभागीय सचिव अमरावती)प्रा अमोल घरडे, प्रा भाग्यश्री ढोणे यां सत्कार मूर्तीचा सत्कार मा. योगेश डाफ साहेब,(सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यवतमाळ)प्रि.आनंद चौधरी, शमीम खान पठाण यांच्या कडुन सत्कार करण्यात आला.30 ऑक्टोबरला संच मान्यतेचा कॅम्प असल्याच्या अनुषंगाने छोट्या खानी हा सत्कार सोहळा आयोजित केला या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील प्रा श्रीकांत लाकडे अमरावती विभागीय सचिव यांचे भरीव योगदान लाभले त्याच प्रमाणे युवा नेतृत्व व मनमिळाऊ स्वभावाचे प्रा अमोल घरडे हे आंदोलनात सहभागी होऊन ईतरांना प्रेरीत करण्याचे काम केले तर यवतमाळ ची अवणी वाघीण भाग्यश्री ढोणे या शिक्षक समन्वयाच्या शिक्षीकांना आव्हाहन करण्याचे काम केले. शिक्षकांना आंदोलनासाठी आव्हान करण्याचे काम प्रा. धिरजसिंह ठाकुर यानी केले त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रा लाकडे सर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले यां सर्वांच्या कार्याची दखल घेत, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या बलिदानाला , प्रेरणेला , लढवय्या वृत्तीला मानवंदना देण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता . प्रा.लाकडे सर यांनी आपल्या भाषणात असे म्हटले की हा सत्कार माझा एकट्याचा नसून खरे शिलेदार प्रा.राहुल कांबळे सर, के पि पाटील सर , अनिल परदेशी सर, संतोष वाघ सर, येरेकर सर, रंगारी सर, आशिष इंगळे सर सोनोने सर,ठाकुर सर आणि जे शिक्षक आजाद मैदान मुंबई येथे आले त्या सर्वांचा हा सत्कार सोहळा आहे असे वक्तव्य त्यांनी केले. मी फक्त माध्यम आहे . या सत्कार सोहळ्यातून शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी व जेव्हा केव्हाही शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन लागेल तेव्हा उपस्थित राहण्याची शिकवण दिली . यांच्या कार्याची दखल यावेळी घेण्यात आली. या छोटेखानी कार्यक्रमात मा योगेश डाफ सर, भाटे सर, काळबांडे सर (शिक्षण उपसंचालक अमरावती)यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा नितीन बाराहाते यांनी केले तर यशस्वीतेसाठी प्रा येन्नरवार सर, प्रा शंकरवार प्रा गोमासे, प्रा ढोले, प्रा मोडक, प्रा वाघ सर ,प्रा.बोबडे सर,भाटे सर,जगताप सर,भिसे सर , निमसटकर सर, भुसारी सर, रमन टेकाम सर, उदार सर, अग्गुवार सर, देरकर सर,जाधव सर व संघातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला
