ढाणकी महावितरणच्या कारभारामुळे शेतकरी त्रस्त,पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचे रात्री जागरण


प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी.


सध्या सर्वत्र रब्बी हंगाम पेरला असून पीक भिजवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. यात रात्रीचे चार दिवस लाईट बारा वाजता येत आहे व आठ वाजता जात आहे. आणि तीन दिवस लाईट ही दिवसाची येत आहे. दिवसाची लाईट ही आठ वाजता येत असून सायंकाळी चार वाजता जात आहे. दिवसाच्या लाईटला लाईनही सतत येजा करत असते. व ट्रिप होत असते. यात शेतकऱ्यांनी भिजवा कसा करावा. हा प्रश्न उभा राहिलेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी एम एस ई बी ऑफिसला लाईट बद्दल फोन केल्यास लाईन कधी येईल अशी विचारणा केल्यास एम एस ई बी.चे कर्मचारी उडवा उडविची उत्तर देतात .अरेरावीची भाषा वापरत आहे. शेतकऱ्यांनी फोन लावल्यास लाईन कशामुळे गेली काही काम चालू आहे का? काही प्रॉब्लेम आहे की काय? कुठे काम चालू आहे का ?असे प्रश्न विचारल्या नंतर समाधान कारक उत्तर न देता एम एस ई बी ऑफिस चे कर्मचारी मी लाईन पकडून ठेवू का? मला काय विचारता असे उत्तर शेतकऱ्यांना मिळत आहेत. अशे कर्मचाऱ्यांचे आडमुठे धोरण योग्य आहे का ? सर्व देशाला अन्न पुरवणारा शेतकरी राजाला अशे उडवा उडविचे उत्तर देणे कितपत योग्य आहे.कोरोणा काळात देशातील सर्व उद्योग धंदे ,सर्व यंत्रणा ,सर्व कंपनी बंद असताना फक्त आणि फक्त बळीराजा हाच शेतामध्ये राबराब राबवून सर्व देशाला अन्नपूर्वत होता. याचे फळ अशा स्वरूपात शेतकऱ्याला मिळत आहे का?याची जाणीव मुजोर व उठोळ कर्मचाऱ्याला नाही का? अशी मुजुरीची भाषा वापरणे कितपत योग्य आहे. असे अनेक सवाल जवाब शेतकऱ्यांच्या वतीने निघत आहेत. महावितरण अभियंतांनी त्वरित अशा कर्मचाऱ्यांची विचारणा करून मुस्कटबाजी करून कारवाई करावी व शेतकऱ्यांची अवहेलना यापुढे होऊ नये अशी खबरदारी बाळगावी .अन्यथा गांजेगाव फिल्टर,शिवारातील शेतकर्यानी थेट उपोषणाला बसण्यात येईल असे आव्हान केले आहे.