
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची उपजिविका ही शेतीवर अवलंबून असून त्यांची शेती ही जंगला भोवताल असून शेतातील असलेल्या पिकांची जंगली जनावरे मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहे. त्या जंगली जनावरापासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तार कुंपण द्यावे अशा आशयाचे निवेदन काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किरण कुमरे यांनी दिं १७ डिसेंबर २०२२ रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
जिल्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून असून अलिकडे या शेतकऱ्यांच्या शेतात जंगली जनावरानी हौदोस घातला असून ही जनावरे उभ्या पिकाची नासाडी करत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतीच्या सभोवताली ताराचे कुंपण करून मिळावे व त्या शेतकऱ्यांना ईतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.यासाठी आदिवासी सेवक किरण कुमरे यांनी महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य मा.सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन दिले आहे.
