शिक्षकांना मुख्यालयीन राहणे बंधनकारक करा ,अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन


प्रतिनिधी,प्रवीण जोशी.
ढाणकी.


उमरखेड तालुक्यातील सर्व शाळेवरील शिक्षक कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. आसा इशारा उमरखेड तालुका मनसे अध्यक्ष शेख सादिक यांनी मनसे जिल्हा प्रमुख देवा शिवरामवार मनविसे जिल्हा प्रमुख अनिल हमदापुरे डेविड शहाणे , राजु पिटलेवाड यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आला आहे
उमरखेड तालुक्यातील प्राथमिक शाळे पासून ते उच्च माध्यमिक शाळे वरिल शिक्षक आपल्या मुख्यालयी कधीच राहत नाहीत. मात्र घरभाडे मुख्यलयाचे घेतात. कर्मचारी मुख्यालयी राहावे अन्यथा कारवाईचा इशारा मा. जिल्हाधिकारी यांनी देवूनही शिक्षक, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत त्यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून एकप्रकारे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. मुख्यालयी न राहणाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. मुख्यालयी न राहणा-या कर्मचारी यांना सात दिवसात मुख्यालयी राहण्याचा आदेश देण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
उमरखेड तालुका जिल्ह्याचे शेवटचे टोक पैनगंगा अभयारण्य शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला तालुका शासन आपल्या कडून अनेक शैक्षणिक योजना ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांकरिता राबवित असते मात्र शिक्षक याची प्रभावी पणे अंमल बजावणी करतांना दिसत नाहीत ग्रामीण भागातील विध्यार्थ्यामुळे मराठी माध्यम जीवन्त आहे उमरखेड तालुक्यातील अनेक गावातील शाळेमध्ये अर्धे शिक्षक नेहमी गायब राहून पगार मात्र महिन्याचा घेत असतात
उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील शिक्षक कर्मचारी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे देत राहतात स्वताचे पाल्य आपल्या शाळेत न शिकवता इतरत्र इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकवतात यामुळे शिक्षणाचा दर्जा अत्यन्त खालावला आहे याला आळा घालण्या करीता शिक्षकानं मुख्यालयी राहणे गरजेचे आहे त्या करिता मनसेच्या वतीने उमरखेड तालुक्यातील शिक्षकांनी मुख्यालयी राहावे न राहल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.