रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, औरंगाबाद माहूर महामार्गावरील प्रकार


प्रतिनिधी प्रवीण जोशी.
ढाणकी


सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्त्याचे विराट जाळे बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे नक्कीच रस्ता चांगला झाला म्हणजे विकास होण्याची प्रक्रिया सुरू होईल व सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन जीवन गतिमान व जीवनमान उंचावेल यात काही शंका नाही. शेतकऱ्यांना भाजीपाला व इतर सर्व मालांची वाहतूक करण्यास सुखर होऊन काही घंट्याचे काम काही क्षणात होईल. व होणारे काम युद्ध पातळीवर होऊन जीवनमान रस्त्यासारखेच वेगवान होईल अशी अपेक्षा असते. व अशी आशा ठेवणे काही वाजवी पण आहे. ढाणकी शहरातून टेंभेश्वर नगर मेट मार्गे हायवेचे काम अत्यंत संथ गतीने होत असून यावर नियंत्रण ठेवणारी मंडळी काय निद्रावस्थेत आहे की काय असा प्रश्न समोर येतो आहे. काही ठिकाणच्या अर्धवट व अपुऱ्या कामामुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे ठीक ठिकाणी महामार्गाचे बांधकाम रखडले असून या मार्गावर धुळीचे साम्राज्य दुचाकी व सर्वच वाहने चालवितांना अक्षरशः मुठीत जीव धरून वाहने चालवावे लागत आहे.
ज्या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम रखडले आहे अशा रस्त्यावरून धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्याला अनेकांना विविध श्वसनाचा आजार जडल्याचे दिसून येत आहे. शिवाय एखाद्या जड वाहन केल्यास एखादा विस्फोट झाल्यानंतर जसा धुरांची लोट दिसतात तशा प्रकारचे धुराचे लोट दिसतात त्यामुळे कदाचित अपघात सुद्धा होऊ शकतो. व ही धूळ श्वसनाद्वारे जाऊन विविध गंभीर आजार सुद्धा जडू शकतात यासोबतच शेतकऱ्यासह विद्यार्थी देखील प्रवास करीत आहे. या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे एकीकडे वाहनामुळे होणारे प्रदूषण तर दुसरीकडे रस्त्यावरून उडणारी धूळ अशा दुहेरी संकटात नागरिकांचे आरोग्य सापडले आहे. दिवसागणिक हजारो वाहने सुसाट धावत असल्याने उडणारी महामार्गाच्या शेतात व शेतातील पिकावर उडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धुळीमुळे शेत जमिनीची पोत बिघडत चालली आहे धुळीमुळे जमीन बंजर होण्याच्या मार्गावर असून शेती नष्ट होत आहेत धूळ पिकावर बसत असल्याने पिकाची वाढ खुंटून पिवळसर पडत आहे परिणामी रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीचा फटका शेतपिकांना बसून याचा नाहक भुर्दंड सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे शासकीय अधिकाऱ्यापुढे संबंधित कंपनी वर चढ आहे का ?असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो.