तरोडा येथे विर बाबुराव शेडमाके यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधन मेळावा


राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

गोंडवाना गणतंत्र पार्टी चा समाज प्रबोधन मेळावा उत्साहात तरोडा ता कळंब येथे आयोजित करण्यात आला असताना गावातील सर्व स्तरांतील समाज बांधव सहभागी झाले होते कार्यक्रमाचे उद्घाटक मा.विठ्ठलदादा धुर्वे जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरु मा.बळवंतराव मडावी प्रदेश कार्याध्यक्ष आणि मार्गदर्शक मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते विशेष अतिथी मा वसंतराव निकम जेष्ठ नागरिक मा राजेंद्र येडमे जिल्हा उपाध्यक्ष मा राजेंद्र मडावी मा कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती स्नेहा ताई मडावी सरपंच तरोडा मा मयुरीताई बोंडे उपसरपंच ग्रामपंचायत तरोडा आणि मा.सुधाकर डहाके पोलिस पाटील उपस्थित होते –. – *विर बाबुराव शेडमाके यांच्या शहिद दिना निमित्त तरोडा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी चे शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले भव्य रॅली काढून सर्व समाज बांधवांनी विर बाबुराव शेडमाके यांच्या जय घोषाने गोंडवाना गणतंत्र पार्टी ची गावं गर्जना करीत सर्व समाज बांधव सहभागी झाला होता कार्यक्रमाचे आयोजन मा हणुमान टेकाम ता.अध्यक्ष कळंब यांच्या पुढाकाराने शाखा फलक लावुन समाज बांधवांचे सहकार्य लाभले त्यात मा ताराबाई कोटनाके जिल्हा उपाध्यक्ष ( महिला ) मा निता ताई कुळसंगे सरपंच ( उदंरी ) मारोतराव मडावी बाभुळगाव मा कलावती ऊईके ( पात्रड ) नामदेवराव आत्राम आणि सर्व तरोडा येथील समाज बांधव सहभागी झाले होते.