लोणी बंदर येथील १७ वरील वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

तालुक्यातील लोणी बंदर येथील १७ वर्षीय साहिल उमेश सोनारखन या शेतकरी पुत्राने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिं १५ जानेवारी २०२३ च्या सकाळी ११:०० वाजताच्या दरम्यान घडली आहे.
उमेश सोनारखन यांच्या कडे सराटी शेत शिवारात स्वतःच्या मालकीची १४ एकर शेती आहे. शेतात कपाशी सोयाबीन पिकाची लागवड केली असून यावर्षी झालेल्या आतिवृष्टीमुळे शेतात लावलेला खर्चा एवढेही उत्पन्न होत नसल्याने कर्जाची परतफेड करावी कशी या विवंचनेत नेहमी आई वडील असायचे त्यामुळे साहिलला आई व वडील कर्जाची चिंता करत असल्याने कर्ज कसे फेडणार या विचाराने साहिल सकाळी शेतात दोर घेऊन आई वडीलाला न सांगता निघून गेला असता शेतात असलेल्या माळोशिला दोर बांधून आत्महत्या केली आहे ही माहिती गावकऱ्यांना मिळताच नागरिक घटनास्थळी पोहचले असता या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर साहिल चा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार संजय चौबे यांच्या मार्गदर्शनात रत्नपाल मोहाडे , राजू शेंडे करीत आहे.