
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सव, पंचायत समिती राळेगाव अंतर्गत ,केंद्र- झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव. येथे नुकत्याच संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळखुटी या शाळेने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या अंगी असलेले कौशल्य पणाला लावून” ब “विभागातून खो-खो या क्रीडा प्रकारात मुले व मुली यांनी परिश्रमपूर्वक विजेतेपद पटकाविले. विशेष म्हणजे सन 2018 सन 2019 व सन 2022( सन 2020 व 2021 कोरोना काळ वगळता) असे तीन वर्ष” ब “विभागातून खो-खो या खेळामध्ये मुलांनी विजेतेपद पटकावून हॅट्रिक पूर्ण केली.” क” विभागातून खो- खो खेळात मुलींनी उपविजेतेपद पटकाविले. तसेच शाळेने सांस्कृतिक विभागातून” समुह नृत्य” प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला तर “नाटिका” प्रकारात सुद्धा द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. तसेच सांघिक क्रीडा प्रकारात 4 बाय 100 रिले मध्ये” क” विभागातून मुली विजेत्या ठरल्या ,तर “ब “विभागातून मुले 4 बाय 100 रिले उपविजेता ठरले. या रिले प्रकारात मुलींमध्ये , संजीवनी गणेश राऊत, हुजेफा लियाकत सय्यद, वनिता शामराव कारंडे, मानवी गणेश धोटे, तर मुलांमध्ये महेश कोहळे, कार्तिक किशोर झलके ,त्यांचे बहुमूल्य योगदान लाभले ,वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत “ब “विभागातून उंच उडी मध्ये पियुष जयदेव पोंगडे, याने सर्वाधिक उंच उडी घेऊन प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकाविले तर महेश कोहळे या विद्यार्थ्याने लांब उडी व थाळीफेक या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांकाचे सिल्वर पदक मिळविले. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत “क” विभागातून” 200 मीटर धावणे” मध्ये राणी गणेश राऊत हि विद्यार्थिनी सुवर्णपदकाची मानकरी ठरली ,”कॅरम” मध्ये हुजेफा लियाकत सय्यद हिने उपविजेतेपद पटकावून ती सिल्वर पदकाची मानकरी ठरली .तर “योगासने” या क्रीडा प्रकारात पुनम प्रबोधन शेंडे हिने उपविजेता पद पटकावून सिल्वर पदकाची मानकरी ठरली. या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक कवडूजी तुमराम यांचे मार्गदर्शन लाभले, तर कबड्डी खेळाचे क्रीडा प्रशिक्षक पुंडलिक देवतळे , खो-खो या खेळाचे क्रीडा प्रशिक्षक महेश सोनेकर, सांस्कृतिक कार्यक्रमाचे मार्गदर्शक व प्रशिक्षक विजय ठाकरे व मायाताई राऊत, वैयक्तिक क्रीडा प्रकारात ” कॅरम” व बुद्धिबळ या खेळाचे मार्गदर्शक दिनेश नागभिडकर, या सर्वांचे मोलाचे सहकार्य सहकार्य लाभले,. शाळेला विजेतेपदाचे दोन चषक, उपविजेतेपदाचे तीन चषक ,सहा सुवर्णपदक व आठ सिल्वर पदक, असे एकूण 5 चषक व 14 पदके मिळवून देऊन सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवून दिले .व शाळेचा नावलौकिक, गौरव वाढविला ,यामध्ये पियुष जयदेव पोंगडे, महेश विनोद कोहळे ,कार्तिक किशोर झलके, अतिफा मुमताज सय्यद, धनश्री बंडू तोडासे, माधुरी सोमा कोरडकर,राणी गणेश राऊत , हूजेफा लियाकत सय्यद, पूनम प्रबोधन शेंडे ,संजीवनी गणेश राऊत, वनिता शामराव कारंडे, मानवी गणेश धोटे, मनस्वी सुधीर वाटकर, खुशी जीवन डोमकावळे,ऋतुजा गुणवंत झाडे, धनश्री संजय उईकें, या विद्यार्थ्यांचे बहुमोल योगदान लाभले खो खो खेळासाठी शिवम सुरेश गाढवे यांचे मुलाचे सहकार्य लाभले.
