
प्रतिनिधी प्रवीण जोशी.
ढाणकी.
ढाणकी बाजारपेठ हे आजूबाजूच्या खेड्यासाठी खूप महत्वाची आहे कारण सर्व खरेदी विक्रीची व्यवहारे करण्यासाठी अनेक गावचे गावकरी ढाणकीला येत असतात. त्यातल्या त्यात सोमवार हा बाजाराचा दिवस असतो त्या कारणाने अनेक गावची लोक येत असतात पण गावात एकही मुत्रीघर असल्याचे आढळत नाही. आणि असले तरी ते सुस्थितीत आहे का नाही बघायला कोणी वाली नाही. अशी परीस्थीतीती असल्या कारणाने अनेक लोकांची कुचंबणा होताना बघावयास मिळत आह्रे. किमान २ राष्ट्रीयकृत बँका आणि पथसंस्थेचे असे मोठे बँकिंग जाळे गावात असल्याकारणाने ईथ सतत गर्दी व लोकांची येजा असते पण येणाऱ्या परगावच्या माणसांची व गावातील व्यापारी बांधवांची येथे मुत्रीघरावाचून अडचण निर्माण होताना बघायला मिळते आहे.तसेच सर्वसामान्य जनता करेल तरी काय पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली नसल्यामुळे सध्या जनतेने गुरांच्या दवाखान्या मागेच मुत्रीघर बनवले आहे. बाहेरगावचे पाहुणे आल्यास त्यांना देशी दारूचे दुकान अगदी कष्ट न करता सापडेल पण मुत्रीघर मुळीच सापडणार नाही गावात अनेक किराणा दुकाने, कृषी केंद्र, कापड दुकाने आहेत. त्या कारणाने अनेक व्यापारी वर्ग सुद्धा गावात येतच असतात. पण लघुशंका करावयाची असल्यास त्यांना सुद्धा या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा या बाबीला सुद्धा पाण्यासाठी जसे डफडे आंदोलन करावे लागले तसे साध्या मूत्रीघरासाठी सुद्धा डफडे व पाण्याच्या टाक्यावर आंदोलन करावे लागते की काय किंवा हा प्रश्न सुद्धा पथदिव्यासारखा बनला का…?? असे शहरवासीयांना वाटत आहे.
