
ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी.
ढाणकी येथील एमसीसी इंग्लिश मीडियम शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री रवी गीते साहेब, रावते सर, दिगांबर शिरडकर सिंहझेप ढाणकी पत्रकार, भालेराव सर, ढेंबरे सर , साहिल चिन्नावार , जाधव सर, शिंगनकर सर, मोटाळे मॅडम, जाधव मॅडम, मोटाळे सर, गुट्टे सर, पांचाळ सर ई.प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. प्रथम विद्येची परम देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलित करण्यात आले. व कार्यक्रमाची सुरुवात श्री गणपतीचे गाण्याने झाली. लहान लहान चिमुकल्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रेक्षकांची मन जिंकली. त्यात देशभक्ती गीत, डान्स ,भाषण असे कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आले. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात लॉंग जंप, कबड्डी, खो-खो व कला कौशल्यात क्रमांक मिळवणाऱ्या चिमुकल्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यात आला. यावेळी चिमुकल्याचा आनंद गगनात मावेनासा होता. सूत्र संचलन प्राजकत्ता चोरे मॅडम व शिवानी वानखेडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन विजय सोनेवाड सर यांनी केले.तसेच शाळेचे मुख्यद्यापक बास्टेवाड सर ,जंगमवार मॅडम, चोरे मॅडम यांनी अतिशय परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
