प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचालित प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र राळेगाव येथे 5 दिवसीय ऍग्रो फॉरेस्ट्री चे प्रशिक्षण संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

या प्रशिक्षणामध्ये 6 राज्यातील प्रथम संचालित शेती लीडर व स्वित्झलँड चे आंतरराष्ट्रीय शेतीतज्ञ रोनाल्ड फ्रुटिंग व बिहारचे खेती संस्थेचे शेतीतज्ञ नीरज कुमार व त्यांच्या संस्थेचे सहकारी व विविध राज्यातून आलेले 30 सहकार सहभागी या प्रशिक्षणामध्ये उपस्थित होते. यादरम्यान फुड फॉरेस्टी – किचन गार्डन मध्ये सेंद्रिय शेती, मल्चिंग, ह्युमिक ऍसिड जीवामृत, फिश अमिनो व अशा विविध पद्धतीची, फळांच्या झाडांची लागवड भाजीपाला लागवड याचे प्रात्यक्षिक करून घेतले व कमी जागेमध्ये चांगल्या पद्धतीने पर्यावरण पूरक शेती कशी करू शकतो याचे तयार उदाहरण प्रथम संस्थे च्या राळेगाव मधील कौशल्य प्रशिक्षण केंद्र मधील शेतीला सगळ्यांनी विजीट केली. व आता हाच कार्यक्रम देशभरातील 1000 गावांमध्ये या टीमच्या माध्यमातून पर्यावरण जागरूक गाव हा कार्यक्रम राबविण्याचा उद्देश आहे. ज्यामध्ये ऍग्रो फॉरेस्ट्री किचन गार्डन व प्लास्टिक लिटरसी व एन्व्हायरमेंटल थ्रू टेक्नॉलॉजी या अंतर्गत राबवल्या जाणार आहे व पर्यावरणाला संतुलित ठेवण्याचा काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधला जाणार आहे.