
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आमदार समिरभाऊ कुणावार यांचे प्रमुख उपस्थितित काल दि.२ रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुशभाऊ ठाकुर यांचे निर्देशानुसार शहर कार्यकारीणी घोषित करण्यात आली.
कार्यकारिणीचे घोषणेनंतर आमदार समिरभाऊ कुणावार यांनी भाजयुमो शहर नवनियुक्त अध्यक्ष सोनुभाऊ पांडे तसेच सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करीत त्यांना लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बाबू बसंतानी, युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश भाऊ ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री अविनाशजी देव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वरूणजी पाठक ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नितीनभाऊ मडावी, हिंगणघाट ग्रामीण तालुका अध्यक्ष आकाशभाऊ पोहाणे ,महिला भाजपा शहराध्यक्ष सौ. अनिताताई माळवे, समाजसेवक सुनीलभाऊ डोंगरे, नगर परिषदेचे स्वास्थ सभापती सोनूभाऊ गवळी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन सुभाष जी कुंटेवार यांनी केले तर भाजपा शहराध्यक्ष आशिषभाऊ परबत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्थानिक आमदार जनसंपर्क कार्यालयात कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणी
सोनूभाऊ पांडे (शहराध्यक्ष), गौरवभाऊ तांबोळी (संघटन महामंत्री), स्वप्निलजी शर्मा (महामंत्री), अतुलभाऊ नंदागवळी (महामंत्री), योगेश्वरजी जिकार (सोशल मिडीया प्रमुख), भुषनजी आष्टनकर (उपाध्यक्ष), मुकेशजी गुजराती (उपाध्यक्ष),
तुषारजी हवाईकर (उपाध्यक्ष), नितीनजी नांदे (उपाध्यक्ष), रितिकजी दांडेकर (सचिव),
निखीलजी हिवंज (सचिव), अक्षयजी हारगोडे (सचिव), नीरजजी सैनी (सचिव), बाबूजी चौहान (सचिव), सुरजजी युवनाथे (संपर्क प्रमुख),
