सोनामाता हायस्कूल चहांद येथील विद्यार्थीनींचे सुयश

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवगर्जना मित्र परिवारा तर्फे शिवाजी महाराज यांच्या जिवनावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली त्यात सोनामाता हायस्कूल चहांद येथील विद्यार्थीनीं कु.अक्षरा चिंतामण महाजन हीने प्रथम पारितोषिक प्राप्त केले तर तृतीय पारितोषिक कु.नेहा अनिल भोयर हीने प्राप्त केले तसेच चित्रकला स्पर्धेत कु.वैशण्वी सिंनू क्षीरसागर हिने चतुर्थ पुरस्कार प्राप्त केला. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल धोबे तसेच श्री चिव्हाने सर,शिवनकर सर, दांडेकर सर,सांवत सर,गोवारदीपे म्याडम, कांबळे सर श्री डहाळकर, देवानंद सोनोने, प्रथमेश राऊत यांना दिले.