
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील लाडकी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची प्रतिक्रिया चहांद, लाडकी सरपंच सौ रूपाली शंकर राऊत यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ माहिती दिली आहे सविस्तर वृत्त असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत लाडकी रस्त्याचे काम सुरू असून या रोजचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदर याच रोडने लाडकी गावात जाण्यासाठी पुलाचेही बांधकाम सुध्दा सुरू आहे. परंतु वडकी राळेगाव रोडवरून लाडकी गावात जाण्यासाठी अंदाजे एक ते दीड किलो मीटर अंतराचे रोडचे काम सुरू आहे या रोडने साईट पट्ट्याने मुरूम टाकण्या ऐवजी सर्रास मातीचा वापर सुरू आहे. इतकेच नाही तर रोडच्या मधोमध गिट्टीचे वापर करण्याऐवजी तिथेही सर्रास मुरमाचा वापर केला असल्याचे दिसून येत आहे यावर कोणीही लक्ष देताना दिसून येत नाही या रोडच्या व पुलाच्या बांधकामासाठी गावातील शेकडो लोकांनी वडकी राळेगाव रोड वर चक्क जाम करून लाडकी गावात जाण्यासाठी पुलाची मागणी केली होती याचे कारण म्हणजे या कमी उंचीच्या पुलामुळे चार महिने बारिश मध्ये गावामध्ये येण्यासाठी गावकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती तर अनेक मोटरसायकल बैल बंड्या या कमी उंचीच्या पुलामुळे नाल्याला पूर येऊन वाहून गेल्या तर एका शेतकऱ्यांना याच पुलावरून आपली दुचाकी घेऊन जात असता आपला जीव सुध्दा गमवावा लागला असल्यामुळे या फुलासाठी गावातील शेकडो महिला व पुरुष यांनी वडकी राळेगाव रोड बंद करून पुलाची मागणी केली होती तर कित्येक वर्षापासून लाडकी येथिल नागरिकांना व शाळा करी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बस स्टॉप ची व्यवस्था सुद्धा अजून पर्यंत करण्यात आली नाही याबाबत संबंधित विभागांना तोंडी व देखी स्वरूपाची तक्रार देऊन सुद्धा अजून पर्यंत या रोडवर बस स्टॉप ची व्यवस्था करण्यात आली नाही. कित्येक वर्षापासून हे गाव विकासापासून कोसो दूर आहे परंतु याकडे या परिसरातील लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाही फक्त निवडणूक आली की लोकप्रतिनिधी येतात आणि आश्वासन देऊन जातात आज उन्हाळ्याचे दिवस आहे लाडकी बस स्टॉप वर ना पाणी पिण्याची व्यवस्था ना बसण्याची व्यवस्था अशी परिस्थिती सध्या लाडकी वासियांची दिसून येत आहे. तर रोड पासून तर लाडकी गावापर्यंत रोडचे काम सुरू आहे.हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे तरी सबंधित अधिकारी यांनी मोक्का पाहणी करून संबंधित ठेकेदार यांच्याकडून चांगल्या दर्जाचे काम करून घेण्यात यावे अन्यथा आम्ही सर्व गावकरी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे रीत सर लेखी तक्रार दाखल करून उपोषणाला बसू सरपंच रूपाली शंकर राऊत चहांद, लाडकी
