हिमायतनगर शहरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा


खासदार हेमंत पाटील व आमदार माधवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती..
जय श्री रामाच्या जयघोषित परिसर दणाणून निघाला


हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

हिमायतनगर- शहरात दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी दि 30 मार्च रोजी सकाळी 12 वाजता सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती कडून प्रभू श्री राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो पण यावर्षी काही तरी विशेष मानून प्रभू श्रीरामाची हैदराबाद येथून आणण्यात आलेल्या बारा फुटी भव्य मूर्तीची शहरातील मुख्य रस्त्याने आज भव्य शोभ यात्रा काढण्यात आली त्या शोभ यात्रेत हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सुद्धा उपस्थिती लावून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन उपस्थित सर्व राम भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या,
यावेळी श्री राम जन्मोत्सव समिती कडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित तरुणांनी डीजेच्या तालावर खासदार हेमंत भाऊ यांना विनंती केली असता त्यांनी जय श्री रामाच्या जय घोष करत राम जन्मोत्सव आनंदात साजरा केला..