
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गेल्या काही वर्षांपासून बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत सेवालाल महाराज जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचे शासनाचे आदेश आहे.असे असतानाही मी एक शिक्षक संघटनेचा जिल्हा पदाधिकारी व बंजारा कर्मचारी संघटनेचा तालुका अध्यक्ष असल्याने बरेचदा अनेक शाळा,विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, शासकीय कार्यालयात गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कार्यालयात भिंतीकडे बघितल्यावर संत सेवालाल महाराजांचा फोटो कुठेही लावलेला दिसत नाही.तर अनेक ठिकाणी संत सेवालाल महाराज जयंती कागदोपत्री साजरी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून ज्या कार्यालयात बंजारा कर्मचारी कार्यरत असेल तेथे मात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.तर काही ठिकाणी अजूनही जयंती तर सोडाच पण साधा फोटो पण लावलेला नाही.तर काही कार्यालयांनी अजूनही फोटो बनवले नसून कुठून तरी तात्पुरती व्यवस्था करून दिखावा दाखविण्यात येते. शासनाने संत सेवालाल जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचे आदेश दिल्यानंतर एक फोटो कार्यालयात कायमस्वरूपी बनवून लावण्याचे आदेश व जयंती साजरी करण्याचे आदेश देण्यात यावे.या बाबतीत संबंधित विभागाने या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
बंजारा कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
