वृक्षवल्लीआम्हा सोयरे वनचरे,वृक्षांना पाणी देत बाबासाहेबांना अभिवादन


(माजी जि. प.सदस्य चितांगराव कदम सरांच्या संकल्पनेतुन गावकऱ्यांनी साजरी केली अभिनव भीम जयंती)


प्रतिनिधी: संजय जाधव ,महागाव


भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त माजी जि. प.सदस्य श्री चितांगराव कदम सर यांच्या संकल्पनेतुन स्मार्ट ग्राम असलेल्या नागापुर(प) च्या गावकऱ्यांनी गावात स्वच्छता अभियान राबवुन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना टॅंकरने तसेच महिला, पुरूष, विद्यार्थी व शिक्षकांनी हांड्यानी डोक्यावरून पाणी आणुन झाडांना पाणी घातले व जयंतीचा कार्यक्रम बंदिस्त सभागृहात न घेता वडाच्या झाडाखाली संपन्न करण्यात आला .यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार, पुष्प घालून पुजन करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांना स्कुलबॅग व पाणी बॉटल वितरण करण्यात आल्या.
कार्यक्रमाला माजी जि. प.सदस्य चितांगराव कदम सर, माजी सभापती सौ.सविताताई चि. कदम,सरपंच रामा ठेंगे , बापुराव कुरमे( उपाध्यक्ष तंटामुक्त समिती), संजय जाधव,
गुलाबराव गोरे ( ग्रामसेवक),मारोती कदम(पोलीस पाटील), रमेशराव कुरमे (अध्यक्ष शा.व्य.समिती),डॉ.अंबादास कदम (अध्यक्ष पर्यावरण ग्रामसमिती),गजानन कदम (मा . सरपंच),विश्वास बरडे (मा. कर्मचारी),उत्तम राठोड( ग्रा.पं . सदस्य),अरूण मुळे (मा. ग्रा. प. सदस्य),सुनंदा जाधव (अंगणवाडी सेविका),सुवर्णा कदम( मदतनीस), ज्योती कदम (ऑपरेटर),बंडू कदम, प्रताप आडे (रोजगार सेवक),मारोती ठेंगे (ग्रामपंचायत कर्मचारी) , शंकर जाधव,चंदु आडे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन घुले सर प्रास्ताविक डॉ.विनय चव्हाण सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक प्रकाश शिंदे सर यांनी मानले.