
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौक व राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार या सर्व गोष्टींना कंटाळून युवक, महिला, शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कर्नाटक निवडणुकीत मतदान केले आणि भ्रष्टाचारी भाजपला हद्दपार केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना काळात सुद्धा उत्कृष्ट काम करत असतांना देखील भाजप ने धनशक्तीच्या जोरावर सत्ता बदल केले. त्यामुळे जनतेत भाजप प्रति रोष आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील जनता भाजपच्या जातीय तेढ आणि धार्मिक राजकारणच्या मुद्याला दूर ठेवून, महागाई- बेरोजगारी सारख्या मुद्द्यांना घेऊन भाजपच्या खोटे आश्वासनांना बळी न पडता मतदान करनार व राज्यातून आणि जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करनार. भाजपची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना धडा शिकवल्या शिवाय जनता शांत बसणार नाही. असे मत तालुका काँग्रेस कमिटी यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी आनंद उत्सव साजरा करताना राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे,काॅग्रेस महिला राळेगाव शहर अध्यक्ष ज्योत्सना राऊत, नगराध्यक्ष रविंद्र शेराम , कुंदन कांबळे, कमलेश गयलोत, बंडू लोहकरे,लियाकत अली,सौ.पुष्पा कन्नाके मधूकर राजूरकर, लियाकत अली, मंगेश पिंपरे,श्रीधर थुटुरकर, बादशहा काझी, पवन छोरीया, अंकुश मुनेश्वर, नंदकुमार गांधी,राजू दुधपोहळे, सुनील भामकर,सुरेश पेंद्राम, गजानन पुरोहित, भानुदास राऊत, गोवर्धन वाघमारे, गजानन पाल,अफसर अली,मंगेश राऊत,श्रावनसिंग वडते, मोहन नरडवार,रामधन राठोड, उत्तम भोरे यांच्या सह,मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
