वणी येथे यवतमाळ जिल्हापोलीस द्वारा भव्य रक्त्तदान शिबीराचे आयोजन


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


दिनांक 16/मे वणी येथे यवतमाळ जिल्हा पोलीस द्वारा भव्य रक्त्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले असून येथील दक्षता हॉल पोलीस स्टेशन वणी येथे सकाळी 8ते 5वाजेपर्यंत असणार आहे .रक्त्तदान हेच जीवनदान आहे रक्त्तदान हेच श्रेष्ठ दान आहे.रक्त्त हे कृत्रीमरित्या तयार करता येत नाही तसेच मानवी रक्त्तघटक ठराविक काळाचं साठविता येतात त्यामुळे सातत्याने रक्त्त. संकलीत करणे आवश्यक असतें वेळेची गरज सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन रक्त्तदान हे सुरु राहीले पाहीजे या उद्दात हेतुने या शिबीराचे आयोजन करण्यात आले. सर्वात मोठी पुण्याई. आणि मिळवा आयुष्य भराची पुण्याई असं म्हटलं जाते.या शिबिराकरिता आपण सर्वं शहरातील रक्त्तदात्यानी शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्त्तदान करावे असें आवाहन डॉ. पवन बनसोड (भा. पो. से )पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ यानी केले आहे या शिबिराकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी वणी पोलीस स्टेशन, वणी मुकुटबन पोलीस स्टेशन,शिरपूर पोलीस स्टेशन, मारेगाव पोलीस स्टेशन. आणि पाटण पोलीस स्टेशन, यांचे सहकार्यातून संपन्न होत आहे.