
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) राळेगाव येथे “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर” उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व छत्रपती शाहू महाराज व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षपद र आमदा. प्राचार्य. डॉ . अशोक उईके यांनी भूषविले. या प्रसंगी. विशाल मिलमिले, प्राचार्य, औद्योगीक प्रशिक्षण संस्था राळेगाव यांनी प्रास्ताविक सादर केले. तसेच गजानन राजुरकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ यांनी या शिबिराचे उद्देश व महत्त्व विषद केले. या शिबिरामध्ये तज्ञ मार्गदर्शक . राम पंचभाई , डॉ. गणेश सव्वालाखे व डॉ . महेश गोरडे हे उपस्थित होते. या तज्ञ मार्गदर्शकानी व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन व १० वी / १२ वी / आय टी आय नंतर काय ? रोजगाराच्या संधी इत्यादी विषयांवर उपस्थीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा. आमदार प्राचार्य डॉ अशोक उईके यांनी अध्यक्षीय भाषण केले यामध्ये त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये श्रीमती उषा त्रिपाठी, प्रकल्प अधिकारी, आयटीआय, अंतरगाव यांनी आभार प्रदर्शन केले व सूत्र संचालन. अजय शेंद्रे, व श्रीमती अजमिरे, शिल्प निदेशक यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी संस्थेतील सर्व शिल्प निदेशक, लिपिक वर्ग कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पार पाडली.
