बकरी ईद आषाढी एकादशी एकाच दिवशी साजरी ,दोन्ही धर्माचे सण शांततेत साजरे

प्रतिनिधी: बिटरगांव ( बु ) शेख रमजान


बिटरगांव येथील दर वर्षी प्रमाणे या वर्षी बकरा ईद साजरी करण्यात आली आहे.पोलीस प्रशासनाच्या वतीने आषाढी एकादशी असल्याकारणाने कुर्बानी न करण्याचे आवाहन करण्यात आले.बिटरगांव ( बु ) व ढाणकीतील सर्व मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांचा सन असल्याकारणाने आज सकाळी होणां-या हिंन्दु धर्मियांचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने कौणत्याही प्रकारची कुर्बानी न देण्याचा निर्णय आणि सर्व हिंदू बांधवांचा धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्यात निर्णय घेतलेला आहे.या बैठकीत आषाढी एकादशीच्या दिवशीं मुस्लिम बांधवांकडुन कुर्बानी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील अनेक ठिकाणी निर्णय घेण्यात आले आहे. यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व धर्म समभाव एकतेचे दर्शन पाहण्यास मिळत आहे. त्यामूळे या निर्णयाचे सर्वञ स्वागत केले जात आहे.