जि. प. प्राथमिक शाळा नागेशवाडी येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड


आज दिनांक 01/07/2023रोजी शाळेच्या दुसऱ्या दिवशी जि. प. प्राथमिक मराठी शाळा नागेशवाडी पोस्ट, निंगनूर ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील शाळेचे मुख्याधापक श्री प्रकाश नारायण गोंड.शाळा समिती अध्यक्ष विलास नामदेव जाधव यांच्या हस्ते वर्ग 1ते 5च्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेतील शिक्षिका, सुनीता घुगे मॅडम. व तसेच विलास. टी. राठोड, मा. सरपंच, अंकुश राठोड, उपस्थित होते. नवीन पाठ्यपुस्तकं बदल श्री गोंड सरांनी मार्गदर्शन केले.