महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे सोबत सहविचार सभा संपन्न

. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यवतमाळ जिल्ह्याची शिक्षक कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर दिनांक 3 जून रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यासोबत सहविचार सभा शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये येथे संपन्न झाली. या बैठकीला मा. शिक्षणाधिकारी माध्य. सौ.जयश्री राऊत,डॉ.श्री शिवानंद गुंडे उपशिक्षणाधिकारी तथा वेतन पथक अधीक्षक, माध्यमिक कार्यालय अधीक्षक श्री जाधव साहेब, श्री. डाफ साहेब, श्री शेंडगे साहेब, सौ. स्मिता घावडे मॅडम, वरिष्ठ लिपिक श्री मनोज खोडे ,श्री पंकज मार्कड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष राजेश मदने, जिल्हा कार्यवाह श्री संतोष पवार, विभागीय सदस्य प्रमोद भेंडे सर कोषाध्यक्ष सचिन देशपांडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सभेमध्ये प्रत्येक महिन्याचे वेतन एक तारखेलाच मिळावे.
◾ भविष्य निर्वाह निधीचा हिशोब पत्रिका दरवर्षी जून पर्यंत मिळावीत.
◾ सातवा वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मिळावा.
◾ वैयक्तिक मान्यता ,वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणीच्या मान्यता, विनापरतावा प्रकरणे ,अंतिम परतावा प्रकरणे, डीएड वेतन श्रेणीतून बीएड वेतन श्रेणी पदोन्नती प्रस्ताव, निपटारा दाखल दिनांकt पासून एक महिन्यात व्हावा .

सेवानिवृत्तीप्रस्तावाचा निपटारा दरमहा तत्परतेने करावा.
◾वैद्यकीय प्रतिकृती प्रकरणे संवेदनशील पद्धतीने सोडवण्यात यावी .
◾सेवा हमी कायदा 2015 शासन निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी.
◾ सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक व शिक्षककेतकर कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी.
◾शिक्षणाधिकारी कार्यालय पत्रव्यवहार ई-मेल द्वारा करण्यात यावा.
◾विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये. (उदाहरणार्थ BLO) इत्यादी अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
◾पगार एक तारखेलाच होईल याची काळजी घेतल्या जाईल फक्त शासनाकडून दोन महिने पैसे उशिरा आल्यामुळे वेतन उशिरा झाले. जून चे पगार बिल आजच ट्रेझरी ला पाठविण्यात आले. ◾सातव्या वेतन आयोग तिसरा व चौथा हप्ता शासनाकडून निधी प्राप्त होताच तो जमा करण्यात येईल. ◾सेवानिवृत्ती प्रस्ताव निपटारा तत्परतेने करण्यात येईल .
◾वैद्यकीय प्रतिकृती देयके मार्च एप्रिल पर्यंतची पूर्ण झालेली आहे. कार्यालयात एकही वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल शिल्लक नाही.
सर्व शाळांनी सेवा जेष्ठता यादी सुधारित करावी ,शिक्षक व शिक्षकेतर यांना सेवा पुस्तकांची दुय्यम प्रत उपलब्ध करून द्यावी, असे सर्व मुख्याध्यापकांना कळविण्यात येईल.असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
अनेक शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या याप्रसंगी तात्काळ सोडविण्यात आल्या.
या सभेला शिक्षक परिषदेचे जिल्हा संघटन मंत्री संजय येवतकर, तालुका अध्यक्ष सुधीर कांनतोडे ,तालुका कार्यवाह आशिष दंडावार, राळेगाव तालुका अध्यक्ष विनोद चिरडे, मारेगाव तालुका अध्यक्ष प्रफुल वराटे, सदस्य राहुल शेंडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
◾आभार प्रदर्शन जिल्हा कार्यवाह श्री संतोष पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या झालेल्या सभेमुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे असणाऱ्या समस्या सोडवण्यास निश्चित मदत मिळणार आहे.