राळेगाव तालुक्यातील धानोरा येवती रोडवरील पोल देतो अपघातास आमंत्रण, विद्युत कंपनी साखर झोपेत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील धानोरा येवती रोडवरील पोल पूर्णपणे झुकले असून येणाऱ्या वाटसरूना अपघातास निमंत्रण देणारे असून या परिसरातील लाईनमनला या गोष्टीची जाणीव असावी परंतु या गोष्टींकडे महावितरण कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या दुर्लक्ष धोरणामुळे एखाद्याला अपघात होऊन जीवित हानी झाल्याशिवाय राहणार नाही.सोबतच धानोरा येथील रामू भोयर यांच्या गट न.122 मध्ये सुद्धा अनेक दिवसांपासून पोल वाकून असून याबाबत सुद्धा संबंधित विभागाला संबंधित शेतकऱ्यांने उन्हाळ्यात माहिती दिली तरीपण या कामाकडे लक्ष न दिल्याने आज शेतकऱ्यांना या संकटाला तोंड द्यावे लागत असून कार्यालयात बसलेले निगरगट्ट अधिकारी मात्र कार्यालयातूनच आपलं कामकाज सांभाळत असून याबाबत अनेकदा तोंडी तक्रारी करून सुद्धा गेंड्याची कातडी पांघरून बसलेले अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही.एकीकडे शेतकऱ्यांची परीक्षा निसर्ग पाहत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांची मुले म्हणणारे अधिकारी मात्र शेतकरी पुत्राची परीक्षा पाहताना दिसत आहे.या सर्व कार्यालयावर देखरेख करण्यासाठी निवडून दिलेले आपलेच लोकप्रतिनिधीना मात्र आपल्या समस्या निराकरण करण्यासाठी वेळ मिळत नसावी ही एक लोकशाहीची क्रुर थट्टा असल्याची चर्चा धानोरा विभागात शेतकरी बांधव करीत आहे. या अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीचा अंकुश नसून त्या अधिकाऱ्याला आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.