आप तालुका संयोजकावरलोखंडी रॉड ने जीवघेणा हल्ला

आम आदमी पार्टीचे तालुका संयोजकावर चार जणांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जिवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.प्रेमकुमार ढुरके असे गंभीर जखमीचे नाव आहे. प्रेमकुमार ढुरके हे आम आदमी पार्टीचे वणी तालुका संयोजक असुन शहरातील रंगनाथ नगर मध्ये वास्तव्यास आहे. आज दि.९ ऑगस्ट ला सायंकाळी ५:३० वाजता चे सुमारास प्रेमकुमार व त्यांचे सहकारी हे दिपक चौपाटी जवळ चाय घेण्यासाठी गेले असता तिथे चार युवकांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला यात प्रेमकुमार ढुरके हे गंभीर जखमी झाले. दरम्यान त्यांना उपचारासाठी येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता एक्सरे मशिन नसल्याने त्यांना एक्सरा काढण्यासाठी खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. यानंतर या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदार वणी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते मात्र या घटनेत शहरातील नामांकित एका जिल्हा पदाधिकाऱ्याचे नाव समोर येत असल्याने याबाबतची तक्रार दाखल करण्यास विलंब होत होता. रात्री १०:३० वाजले तरी तक्रार दाखल करण्यात येत नसल्याने अखेर तक्रार दाखल न करताच तक्रारदार वणी पोलीस स्टेशन मधुन घराकडे निघुन गेल्याने एकच खळबळ उडाली. मात्र या गंभीर घटनेची तक्रार का घेण्यात आली नाही याबाबत माहिती नाही.