
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालयात
दि. १२ ऑगष्ट २०२३ रोज शनिवारला भौतिकशास्त्र विभागा तर्फे डॉ. विक्रम साराभाई याच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. संतोष व्हि. आगरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.कपिल डी. जगताप, आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा. विवेक डी. समर्थ, ग्रंथपाल डॉ. विरेन्द्रकुमार एल. बर्डे तसेच गणित विभाग प्रमुख डॉ. अल्फ्रेड वाय. शेख हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. अमोल लिहितकर यांनी केले. प्रा. श्री. कपिल डी. जगताप यांनी डॉ. विक्रम साराभाई यांच्या जिवनावर प्रकाश टाकत त्यांनी अवकाश-शास्त्र मध्ये दिलेल्या योगदाना बद्दल माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. संतोष व्हि. आगरकर यांनी विद्यार्थ्यांना अवकाश शास्त्र व चंद्रयान-३ बद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान या क्षेत्रामध्ये आपले योगदान द्यावे यासाठी प्रेरित केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्य करीता भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. श्री. भूषण ह. भट्टी यांनी मौलाचे सहकार्य केले.