स्वातंत्र्य दिना निमित्त जि प कें उच्च प्राथमिक शाळा मार्लेगांव येथे ध्वजारोहन,माजी सैनिकांचा सत्कार



मुलांची भाषण व गीतगायन बक्षिस वितरण ,
सैनिकांचा सत्कार ,
ग्राम पंचायत प्रतिनिधीचा सत्कार
मुलांच्या विविध कलाकृतीच प्रदर्शन

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

सैनिकांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांच पुजन करुण कार्यक्रमाची सुरवात झाली . कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव पाटील , ग्राम पंचायत सरपंच , उपसरपंच , सदस्य , पोलिस पाटील , से सह सो अध्यक्ष , शाळा व्य समिती उपाध्यक्ष , सदस्य , माजी अध्यक्ष , ग्राम सेवक , तलाठी , पोलिस पाटील , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षीका , ग्रामस्थ व विद्यार्थ्याच्या उपस्थीतीत कार्यक्रम संपन्न झाला .
प्रस्ताविक व संचालन प्रमोद पवार सर यानी केले . सैनिकांच्या ड्रेस कोड विषय माहीती नागोराव कदम , प्रकाश खंदारे व सुरज शिंदे यांनी दिली .
शाळेला विद्युतीकरणासाठी निधी दिल्या बद्दल ग्रामपंचायत प्रतिनिधींचे शाळे तर्फे स्वागत करण्यात आले .
सरपंच , सदस्य , ग्रामसेवक व अन्य काही मान्यवराच्या सहकार्यातुन विद्यार्थ्याना पुरी भाजीच जेवण देण्यात आली ह्यासाठी शिवाजीराव कदम , जि के कदम , गंगाधर शिंदे , गजाननराव कदम , लक्षण कदम यांचे सह रामेश्वर शिंदे , विनायकराव कदम , परमेश्वर शिंदे ह्यानी खुप मेहनत घेतली . कार्यक्रमासाठी मोफत साहित्य देण्याच काम बंडू भोपळे व शुभम कदम यांनी केले . सर्वांचे आभार विनायकराव कदम यानी मानले .