शहरातील खड्डयात बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा खरपूस समाचार, मनसेची खड्डेमुक्त जिल्हा करण्याची मागणी

`


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आगळेवेगळे आंदोलन



वाशीम – ठिकठिकाणी पडलेल्या खडडयांमुळे शहराची आज दयनिय अवस्था झाली असून नागरीकांची हाडे खिळखिळी होत आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाचे याबाबीकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब हेरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात स्थानिक अकोला नाका येथील चौकातील खड्डयात बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा आगळ्यावेगळ्या प्रकारे निषेध केला.
आंदोलनाचे आयोजन मनसे शहर संघटक प्रतीक कांबळे, शहराध्यक्ष गणेश इंगोले व शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव यांनी केले. शहर आणि शहरातून जाणार्‍या विविध रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी नगर परिषद, नगर पंचायत, सा.बां. विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जि.प. बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतची आहे. मात्र प्रत्येक विभाग आपल्या जबाबदारीतून अंग काढू पाहत आहे. यामुळे रस्त्यावर पायदळ आणि वाहनाने चालणार्‍या नागरीकांसह वयोवृध्द आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना या खड्डयांमुळे अपंगत्व आले असून गरोदर महिलांना याचा मोठा त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे संबंधीत विभागाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते राजु उंबरकर, जिल्हा संपर्क नेते विठ्ठल लोखंडकर, जनहित व विधी विभागाच्या राज्य उपाध्यक्षा प्रा. संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात शहरातील अकोला नाका स्थित खड्डयात बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रशासनविरोधी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देवून खड्डेमुक्त जिल्हा करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात मनसेचे तालुका संघटक रघुनाथ खूपसे, तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे, मालेगाव तालुका अध्यक्ष गजानन कुटे, रिसोड शेतकरी सेना तालुका अध्यक्ष वैभव वानखेडे, ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक शंकर बांगर, शिवाजी पडघान, नैन्सी कांबळे, विभाग अध्यक्ष देवा खरे, विभाग अध्यक्ष दिपक काशीदे, शाखा अध्यक्ष बाळू वानखेडे, शाखाध्यक्ष राजू शिराळ, रमेश खरे, कैलास रौदळे, सचिन इंगोले, गौतम राऊत, ऋषी धोटे, निखिल नवघरे, मोहन राऊत, सौरव मस्के, देविदास जैताडे, भानुदास कुटे, अमोल जगताप, दत्ता बुंदे, शेख जाफर, आदित्य झंवर, शिवराज बांगर, साहिल गवळी, अक्षय बांगर, सोनू शिंदे, विशाल कांबळे, मंगल घोडे, शिवम साठे, विजय नंदापुरे, पवन खरे यांच्यासह मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. आंदोलनस्थळी पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.