
राळेगाव तालुक्यातील विहिरगांव येथील एका युवा शेतकऱ्याने विषारी किटक नाशक औषध प्राशन करून मृत्यूला कवटाळले हि घटना 4 सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
वैभव देवराव लुंगसे (19) रा विहिरगांव असे त्या आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचे नाव असून त्याने स्वताच्या शेतात जाऊन विषारी किटक नाशक औषध प्राशन केले या घटनेची माहिती नातेवाईक व गावकऱ्यांना मिळताच त्याला कंरजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या युवा शेतकऱ्यांकडे तीन एकर सामुहिक शेती आहे त्यांच्या मागे वडील, आई , दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे अद्याप मृत्यूचे कारण कळू शकले नाही
