शिरपूर पोलीस स्टेशनची सूत्र संजय राठोड यांचेकडे, एपीआय गजानन कारेवाड यांची बदली

वणी :- तालयक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनचे सूत्र एपीआय संजय राठोड यांनी आज ता.१४ रोजी दुपार ३ वाजता सांभाळली असून या ठिकाणी कार्यरत असलेले ठाणेदार गजानन कारेवाड यांची बदली करण्यात आली आहे.
मागील एक ते दीड वर्षांपासून गजानन कारेवाड हे शीरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून रुजू झाले होते. परंतु त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी नाराज असल्याने त्यांची आज तळकाफडकी बदली झाल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले एपीआय संजय राठोड यांचेकडे आज पासून शिरपूर पोलीस स्टेशनची सूत्र आली असून ते आज शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये रुजू झाले आहे.