

चंद्रपूर जिल्हा प्रामुख्याने कापूस ,सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.कापूस पिकावर येणाऱ्या बोंड अळीच्या प्रादुर्भाव रोखणे अशक्य असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वळला .परंतु यंदा कापूस पिकावर बोंड अळी चा प्रभाव तर आहेच परंतु सोयाबीन पिकावर देखील अज्ञात अश्या करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिके पिवळी येत वाळत असल्याने शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची 100 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शासनाकडून एकरी 50 हजाराची आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी शेकडो शेतकरी ट्रॅक्टर सह उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या कार्यालयावर धडकले .
वयोवृद्ध ,तरुण ,शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिला ,मुले सर्वजण यात धडक मोर्चात सामील होत आपल्या वेदना शासना पर्यंत पोहचविण्यासाठी मोर्चात सहभागी झाले होते.60 ते 70 ट्रॅक्टरवर तिरंगा झेंडा लावून शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.तालुक्यातील विविध गावातून आलेले शेतकरी यात सहभागी होत सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे निवेदन उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना करण्यात आली आहे.
सविस्तर विडिओ पहा
