
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
शहरातील रस्त्यावर जागोजागी खडे पडले त्यावर नगरपंचायतीने उपाययोजना करून खडे बुजवण्याची मागणी नागरीक करीत होते नागरिकांच्या मागणीला नगरपंचायत नेहमीच दुर्लक्ष करताना दिसत आहे नगरपंचायत नागरिकांनी सुचवलेल्या खडे बुजवण्याच्या मागणी कडे दुर्लक्ष करत असल्याने नागरीकांनी आपली मागणी शिवसेनेकडे(ठाकरे गट )केली नागरीकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागणीला नगरपंचायत केराची टोपली दाखवत असल्याने शिवसेनेने खडे बुजवण्याची मागणी नगरपंचायत कडे करत आहे.
ढाणकी शहरात अनेक गणेश मंडळाकडून गणपती बापाची स्थापना झाली आहे आपल्या लाडक्या बापाचे दर्शन घेण्यासाठी भावीक भक्त मोठ्या प्रमाणात घरा बाहेर पडत आहेत मात्र शहरातील रस्त्यात खडे कि खड्यात रस्ते कळायला मार्ग नसल्याने अनेक भावीक भक्त पडून किरकोळ जखमी होत आहेत त्यात भरीस भर निसर्गराजा मनसोक्त बरसत असल्याने रस्त्यावरील खडे पाण्याने भरले आहेत रस्ता आहे कि खडा दिसत नाही
शहरातील रस्ते खडे मुक्त करण्यासाठी नगरपंचायत ला शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी तोंडी लेखी सांगण्यात आले मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर दिनांक २४ सप्टेंबर रोजी मेनरोड वरील खड्यात मासोळी सोडो आंदोलन करून झोपलेल्या नगरपंचातला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, शिवसेना शाखा प्रमुख बंटी जाधव, युवा सेना तालुका प्रमुख संभाजी गोरठकर, सोशल मीडिया तालुका प्रमुख युवा सेना शहर अध्यक्ष विजय वैद्य, फिरोज भाई, ऐजाज पटेल, प्रशांत जोशी, आमोल गायकवाड, गजानन धोपटे, रमेश कदम, वैभव भडदम ,श्याम शिराळे, धनंजय इंगळे, माधव आसेवाड ,बालाजी आलकटर सुरेश कळमकर, साजिद खान, संतोष धुळे, विजय गायकवाड, शेख परवेज ,बंटी फुलकोंडवार, विजय ठाकूर, विजय भंडारे, यासह इतरही शिवसैनिक उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ढाणकी शहरात येणार रस्ता एक वर्षापूर्वी केला मात्र सदर रस्त्याला उत्तर काढला नसल्याने शहरातील शिवाजी महाराज चौकात पाणी साचून राहत आहे. त्यामुळे रहदारी करते वेळी गाड्यातील पाणी उडून नागरिकांच्या अंगावर उडत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्डे बुजून पाणी काडून दयावे अशी मागणी करत गाड्यात मासोळी सोडून बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला.
आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार सुजाता बन्सोड जमादार मोहन चाटे खो. पी. य. पुलिस दता कुसराम बंदोबस्त केला.
शहरातील रस्त्यावर खूप सारे खडे पडले त्यावर चालणे कठीण झाले आहे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात गणपती स्थापना करण्यात आले अवघ्या काही दिवसा वर अनंत चतुर्थी विसर्जना आहे त्यामुळे नगरपंचायतीने त्वरित खडे बुजवण्यात यावे अन्यथा नगरपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल.
विशाल नरवाडे
सोशल मोडीया प्रमुख ढाणकी
