
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
सध्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या काढणीला काही दिवसांनी सुरुवात होणारा असून सोयाबीन हे मुख्य पीक असल्यामुळे मळणीयंत्राची गरज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लागते त्यामुळे कमीत कमी वेळात व कमी मजूर लागणारे मोठमोठे मळणी यंत्र सध्या बाजारात आले असून मागील रब्बी हंगाम काढल्यानंतर ही मळणीयंत्र, मळणीयंत्र चालकाने व्यवस्थितपणे शेतातील आखाड्यावर झाकून ठेवले होते. पण अगदी खरीप हंगामासाठी ही यंत्र दुरुस्तीसाठी इंजीनियरिंग वर्क्स दुकानाकडे येताना बघायला मिळत आहे. वेळेवर कोणत्याही परिस्थितीत यंत्रे दुरुस्ती करणे शक्य नसते म्हणून मळणीयंत्र चालक आपली यंत्र सोयाबीन काढण्यासाठी सुधारित आणि नीटनेटके करून ठेवताना दिसत आहे. तसेच सोयाबीन काढण्यासाठी मजूर वर्गाला एकत्रित केलेल्या ढगाच्या स्वरूपातील सोयाबीन मशीनमधून काढण्यासाठी क्विंटल किंवा ढगाचेगुत या प्रमाणात मजुरांना ठरवितांनाही बघायला मिळत आहे
सध्याच्या असलेल्या खरीप हंगामामध्ये निसर्ग राजाने उघडीक दिली तर दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्याची शेतातील माल काढण्या करिता त्रेधातिरपिट होणार नाही पण हाल आणि दशा न होता शेतकऱ्याच्या पदरात माल होईलच असे नाही त्यामुळे अशावेळी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व विना अडथळा माल काढावयाचा असल्यास मशीनची देखभाल करणे जरुरीचे असते आणि शेतकरी सुद्धा कमी वेळात आणि ज्या मळणीयंत्रावर अधिक मजूरवर्ग आणि रात्रीच्या वेळीला सुद्धा सोयाबीन काढता येईल अशा सुसज्ज असलेल्या मळणीयंत्राला शेतकरी वर्गाकडून अग्रक्रमाने मागणी होत असते. निघणाऱ्या मळणीयंत्रातील जसा माल निघतो तशा पद्धतीने त्याच्या भावाचा दर्जा ठरवला जातो जगाचा पोशिंदा म्हणून मौखिक रूपाने बोलघेवडे नेते आपल्या भाषणात नेहमीच सांगत असतात पण ज्यावेळी बाजारपेठेत माल विकायला येतो त्यावेळी मात्र कट्टी, काटा, आणि धारा, अशा विविध स्वरूपातील क्रियेतील प्रक्रिया करणारे राजकारणी मात्र आपल्या राजकीय पोळ्या भाजतात हेच या देशाचा आर्थिक कणा म्हणून म्हणवल्या जाणाऱ्या शेतकरी वर्गाच्या नशिबी यावे…! पण काम श्रम करणारा व्यक्ती आपण केलेल्या श्रमाची किंमत स्वतः ठरवतो पण शेतकरी हा एकमेव असा असेल की जो माल बाजारपेठेत आणून आपल्या मालाची किंमत इतरांना ठरवायला लावतो शेतकऱ्याचा माल बाजारपेठेत आला म्हणजे व्यापाऱ्यासाठी दिवाळी आणि दसरा असा दुहेरी सण आल्याचा सुमध्यसाधून भाव ठरवून पाडल्या जातो व साध्या नायलॉनच्या व त्याचे वजन हे १०० ग्रॅम असते पण १००० ग्रॅम अर्थातच १किलो ग्रॅम धरल्या जाते आणि स्वार्थी नेते व्यापाऱ्यांना सहकार्य करतात त्यामुळे शेतकरीवर्ग आपल्या मालाला योग्य भाव लागावा यासाठी चकाकीदार आणि काडीकचरा होणार नाही अशाच मळणी यंत्राची निवड करतात त्यामुळे बाजारपेठेत सुद्धा मळणी यंत्रचालक आपली यंत्रे सुसज्ज ठेवताना दिसत आहेत मळणी यंत्राचा मुख्य गाभा म्हणजे असणारे नटबोल्ट, झुला, पट्टे, पक्के असणे जरुरी असते त्याला अनुसरून सुद्धा मळणीयंत्राच्या दुरुस्तीकडे मळणी यंत्रचालकाचा कल दिसतो आहे.
