
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या संपूर्ण जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या पत्नीचे म्हणजे सिता मातेचे देशातील एकमेव मंदिर हे जिह्यातील राळेगाव तालुक्यात रावेरी येथे आहे. आज या मंदिरात सिता मातेच्या मूर्तीची पुनरप्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर सपत्नीक हजारों भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मांसाहेब जिजाऊ, पंढरपूरच्या विठ्ठलाची अर्ध्यांगिनी रुख्मिणी यांचे माहेर हे विदर्भाचेच आहे. त्यातच श्रीराम पुत्रांचा जन्म सुध्दा याच भूमी झाला त्यामुळे विदर्भाची भूमी ही योद्दांना आणि वीरांना मातृत्व बहाल करणारी आहे. अस मत यावेळी राजू उंबरकरांनी व्यक्त केले… विदर्भाची भूमी अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तर जगातील अनेक मोठ्या मातृशक्तीचा जन्म आपल्या विदर्भातच झालेला आहे. तर अनेक मातृत्वांचा सहवास या भूमीला लाभलेला आहे. प्रभू श्रीरामांच्या वनवास कालावधी दरम्यान माता सीतेला यातच यवतमाळतील राळेगाव तालुक्यात रावेरी येथे त्यामुळे या तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. रावेरी येथे प्रसिद्घ सीतामातेचे मंदिर आहे. देशातील पहिले सितामातेचे मंदिर असलेल्या रावेरी याठिकाणी सीता मातेच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज या ठिकाणीं मंदिरातील जुनी भग्न झालेली मूर्ती बाजूला ठेवत त्या जागी नव्या मुर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी त्यांच्या पत्नी सौ. तृप्ती उंबरकर यांच्या हस्ते विधिवित पूजा अर्चा आणि मंत्रोत्पचाराच्या घोषात या सकाळी ०९. २७ मिनिटांनी या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. व विधिवत होम हवन करुन मातेची आरती करण्यात आली.
भारतवर्ष गेल्या ५ शतकांपासून प्रतिक्षा करत असलेल्या प्रभू श्रीरामांचं अयोध्या येथील जन्मभूमी मंदिराचं लोकार्पण २२ जानेवारी, २०२४ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०५/११/२०२३ रोजी देशातील एकमेव सिता मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या कार्यक्रमास ओम नवशक्ती अंबिका भक्तीधाम संस्थापक परमपुज्य अंबिकाभारती, पंजाब माजी खासदार भुपिंद्रसिंग मान,माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके माजी आमदार वामनरावजी चटप, माजी आमदार सरोजताई काशिकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, माजी जि.प. सदस्य दिपक येंबडवार, वैभव पुराणकर, रमेश कनाके, स्थानिक ग्रामस्थ, भाविक भक्त, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तेव्हा पासुन या गावात गव्हाची नापिकी..
रावेरीतून वाहणारी रामगंगा ही रामायणातील तमसा नदी असून ती येथून वाहते. लव-कुशाचा जन्म झाल्यावर सीता गहू मागण्यासाठी गेली असता गावकऱ्यांनी हाकलून दिले. यामुळे तिने गावकऱ्यांना शाप दिला. तेव्हापासून अलीकडील काळापर्यंत रावेरी येथे गहू पिकत नाही, अशी या मंदिराची आख्यायिका आहे.
