मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिन साजरा

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये
3 जानेवारी , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,प्रसंगी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेच्या फोटोला हार अर्पणकरण्यात आले मुख्याध्यापक मान, मो. अमिन मो, नुरानी यांनी विध्यार्थी यांना त्यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकणारी , तसेच स्त्रीशिक्षिका यांचे मोलाचे स्थान, तसेच पहिली शाळा काढताना त्यांचे मोलाचं योगदान या विषयावर सविस्तर माहिती दिली.शाळेच्या आयुशी घुगे या विध्यार्थीनीं व शिक्षिका सौ.शुभांगी देशमुख यांनी सवित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकारली, व त्यांच्या जिवन कार्यावर तसेच बालिका दीन विषयी माहिती देण्यात आली. आणि आजच्या या शुभ दिनी शाळेमध्ये सुरू असलेल्या ग्रंथालयाला शाळेतील विद्यार्थी देवांश त्रिवेदी, स्निग्धा आवारी, तसेच शिक्षिका सौ माया त्रिवेदी, उज्वला नगराळे यांनी पुस्तके तसेच पुस्तके खरेदी करीता रोख रक्कम सौ उल्काताई काकडे यांनी भेट दिली, त्यांचे संस्थेचे व शाळेचे वतीने आभार मानण्यात आले. वाचाल तर वाचाल ही संकल्पना अशीच चालू राहील.
कार्यक्रमाचे संचालन उज्वला नगराळे तसेच आभार निशा शेख यांनी मानले, कार्यक्रम यशस्वितेकरीता सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
.