धानोरा येथील घरकुल लाभार्थ्यांना जागेचे पट्टे तात्काळ देण्यात यावे:जिल्हाधिकारी यांना निवेदन , मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसणार

राळेगाव तालुक्यातील मौजा धानोरा येथील वार्ड न 3 मध्ये राहत असलेल्या सर्व नागरिकांना जागेची मोजणी करून पट्टे द्यावे जन्मापासून रहिवासी आहे सर्वांचे कुडा मातीचे घर आहे सर्व नागरिक राहत्या घरासह जागेच्या नियमित ग्रामपंचायत मध्ये कर भरणा सुध्दा करित आहे परंतु राहत असलेल्या जागेचा अजुन पट्टे नाही मिळाले त्यामुळे सर्व शासकीय योजनेपासून वंचित आहेत सन 2014 मध्ये सर्व नागरिकांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादी समाविष्ट होते परंतु हक्कांचे जागेचे पट्टे नसल्यामुळे घरकुल योजनेपासून वंचित रहावे लागले याबाबत अनेकदा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी ग्रामपंचायत धानोरा यांच्याकडे घरांचा लाभ मिळण्याकरिता जागेचे पट्टे मिळण्यात यावे अशी मागणी केली होती परंतु अजूनही न्याय मिळाला नाही सर्व नागरिकांचे कुडा मातीचे कच्चे स्वरुपाचे घर तेव्हा त्यांना घरकुल ची नितांत गरज आहे रोजमजुरी करुन जगतात त्यामुळे पक्के घर बांधण्यासाठी असमर्थ आहे तसेच सर्व भुमिहीन आहे या प्रकरणात लक्ष देऊन घरकुलचा लाभ मिळण्याकरिता तात्काळ जागेचे पट्टे देण्याकरिता संबंधित कार्यालयाला आदेशीत करावे जर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मौजा धानोरा येथील सर्व लाभार्थ्यी 26 जानेवारी पासून बिरसा मुंडा पुतळ्या समोर अमारण उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा निवेदनात जिल्हा अधिकारी यांना देण्यात आला निवेदन देतेवेळी, प्रमोद ढाले, संदीप जुमनाके, दिलीप जुमनाके, दादाराव गेडाम,विजय मेश्राम, संजय कनाके, रामभाऊ जुनघरे, भोजराज जुनघरे, राजु मेश्राम, गजानन सुरकार,किरण बिटे, तसेच सर्व लाभार्थ्यी उपस्थित होते.