
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरांतील निकिता मोरेश्वर नागोसे हीची वनरक्षक दलात निवड झाल्याबद्दल तिचा शहरातील क्रीडा संकुल येथिल नवोदय क्रीडा मंडळाच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम घेऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी विनय मुनोत, डॉ फुलमाळी,गुरुदास नगराळे महेश भोयर हे उपास्थित होते त्यावेळी सत्कार मुर्ती निकिता हिने घरची परिस्थिती बेताची असतानाही ती खचून न जाता यश मिळवले आहे व पोलीस भरती मध्ये कमी मार्कने तीची निवड झाली नाहीं तरीही तीने तिचा मैदानी सराव व अभ्यास सुरूच ठेवला त्यामुळे मला हि वनरक्षक दलात दाखल होण्याची संधी मिळाली असे निकिताने सत्काराला उत्तर देताना बोलुन दाखवले व या यशामागे माझ्या आईचा मोठा हात आहे हेही सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन नवोदय क्रीडा मंडळाचे प्रवीण गिरी, सचिन एकोणकर दीपक पेंदे,नरेश दुर्गे, प्रफुल्ल खडसे, गणेश काळे, मोणू खान, सूरज भगत, डॉ जोजो पठाण महेश राजकोल्हें , आदित्य मरसकोल्हे सोनू खान सूरज भगत,सचिन डोंगरे, निखिल ठाकरे, सूरज उजवणे, हिमांशू ठाकरे, आर्यन देवकर व मयुरी चौधरी यांनी केले असून सुत्र संचलन प्रफुल्ल खडसे.
