
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद व आर. टी. एस. सी. फॉउंडेशन यांच्या कडून MPSC व UPSC च्या धर्तीवर आयोजित वर्ग 2 ते 9 च्या विद्यार्थ्यां साठी स्पर्धा परीक्षा राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दिनांक 26 फेब्रुवारी रविवार रोजी संपन्न झाली. या स्पर्धा परीक्षेत राळेगाव तालुक्यातील 192 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला ही परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन करण्यासाठी केंद्र संचालक म्हणून किशोर उईके, अरुण कामनापुरे,आनंद घुगे, प्रवीण कारेकर,,कु रेश्मा भोयर, कु रुपाली कुबडे, कु. धनरे मॅडम,थुल सर, गवळी सर, श्याम राऊत, गणेश झाडें,शिपाई भास्कर लोंढे तर या स्पर्धा परीक्षा केंद्रास मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे यांनी भेट देऊन स्पर्धा परीक्षेबाबतीत समाधान व्यक्त केले.सदर स्पर्धा परीक्षा राळेगाव सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात आयोजित केल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा कशारीतीने देता येऊ शकतात याबाबतीत विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे..
