दहेगाव येथे शिला फलकांचे अनावरण व वृक्षारोपण

ग्रामविकास विभाग व पंचायत विभागाच्या सुचनेनुसार मेरी माटी,मेरा देश’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता.२५) सकाळी ११ वाजता दहेगाव ग्रामपंचायतीमध्ये आझादी का अमृत महोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा विजन २०४७ संदेश, मातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीरांना शतशः नमन असे वाक्य लिहिलेल्या शिलाफलकाचे अनावरण व वृक्षारोपण सरपंच सौ राधाबाई टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी उपसरपंच सौ वंदनाताई ताजणे, ग्रामपंचायत सदस्य. कवडुजी मांडवकर, मारोती डाहुले, रविंद्र मडावी, ग्रामविकास अधिकारी ए.एस गाणार, रोजगार सेवक राजेंद्र लांडे, लिपिक सतिश पेंदे, संगणक चालक हर्षल शेंबडे, खुशाल खोके ग्रामपंचायत कर्मचारी यांसह गावातील नागरिक उपस्थित होते.