खासदार भावना गवळी यांनी राळेगाव येथील श्रीराम मंदिर, हनुमान मंदिरात घेतले दर्शन

(प्रभु श्रीरामचंद्रच्या कार्याचे अवलोकन करणे हे आजच्या युगात मनुष्याला गरजेचे, खासदार भावना गवळी )

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अयोध्येत राममंदिरात होत असलेल्या प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा च्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, वाशिम लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार भावना गवळी यांनी राळेगाव येथील राम मंदिर, हनुमान मंदिर, साईनाथ मंदिरात जाऊन आरती करून दर्शन घेतले.व रामभक्त महिला, पुरुष बालगोपाल यांना प्रसादाचे वाटप केले. यावेळी प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व दिपोत्सवाच्या निमित्त राळेगाव येथील श्रीराम मंदिरात सौ.अर्चनाताई क्षीरसागर,आचल चौधरी,खुशी काळे,तनु क्षीरसागर ,मोनाली ठाकरे,हर्षदा नरनावरे,दिव्यानी सोनुने यांनी प्रभु श्रीराम ची सुंदर रांगोळी काढली होती ती रांगोळी बघुन खासदार भावना गवळी यांनी त्या तरुणीचे कौतुक केले.प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व दिपोत्सवाच्या यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकार, राज्य सरकार व कोणत्याही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी महिलांचा सन्मानच केला पाहिजे पुढील काळ हा नारीशक्तीचा असणार आहे.तसेच प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा च्या दिवशी सर्व जनतेने दिवाळी साजरी करावी व गोड पदार्थ करून खावे ना.संजय राठोड मृद व जलसंधारण मंत्री म.रा.तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांच्या साखर वाटप कार्यक्रमास उपस्थिती लाऊन नागरीकांना साखरेचे वाटप करण्यात आले.व राळेगाव येथील काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घरी,व दुकानदार जाऊन प्रभु श्रीराम यांच्या भजनात बसुन भजन केले . यावेळी राळेगाव शहरात संपूर्ण राममय झाले होते त्यामुळे राळेगाव शहराला अयोध्येत स्वरूप आल्याचे आल्यासारखे दिसुन येत होते.यावेळी मनोज भोयर शिवसेना शिंदे गट राळेगाव तालुका प्रमुख संतोष कोकुलवार, शिवसेना शहरप्रमुख,डॉ.कुनाल भोयर अध्यक्ष राळेगाव शहर भा.ज.पा, अँड. योगेश ठाकरे युवा सेना तालुका प्रमुख,सौ.पार्वताबाई मुखरे महिला आघाडी शहर प्रमुख,चांदभाई करेशी ता.अ.अ.आघाडी, हरीहर हरबडे,संदिप पेंदोर शहर संघटक, नितीन हिकरेउप शहर प्रमुख ,किशोर वाघ उप तालुका प्रमुख राळेगाव, दिवाकर जवादे उपतालुका प्रमुख राळेगाव , जगदिश गोबाडे वि. प्र., विठ्ठल उताने वि.प्र. बालु सरोदे व राळेगाव तालुक्यातील शिवसेना शिंदे गट,व भा.ज.पा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.