
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब येथे केपीएल कळंब प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत राज्याचे माजी शालेय शिक्षण तथा क्रीडा मंत्री प्रा. वसंत पुरके व प्रा. दोंदल सर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिकेट खेळासह इतर सामाजिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या राळेगाव येथील आदर्श क्रिकेट क्लबचे जेष्ठ खेळाडू फिरोज लाखाणी यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच यावेळी चंदुभाऊ चांदोरे (चिंतामणी क्रिकेट क्लब), नसीम काझी (रब्बानी क्रिकेट क्लब), चंदू कामडी (शिव क्रिकेट क्लब), अनील काकडे ( शिव क्रिकेट क्लब), कलिमभाई कुरेशी (रब्बानी क्रिकेट क्लब), संजय घुमनार (शिव क्रिकेट क्लब), योगेश धांदे (ओम क्रिकेट क्लब), राजू भोयर (शिव क्रिकेट क्लब), गजानन नेहारे (ओम क्रिकेट क्लब), सचिन माहूरे (शिव क्रिकेट क्लब) यांचाही सन्मान करण्यात आला आहे.
फिरोज लाखाणी यांनी राळेगाव शहराला क्रीडा क्षेत्रात मोठं नावं मिळवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून जसं जसं जगात क्रीडा क्षेत्रात बदल होत आहे त्याप्रमाणे आपल्या राळेगाव शहरासह तालुक्यातील क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना मंच उपलब्ध करून देण्याच काम फिरोज लाखाणी हे करत आहे. आज त्यांच्या या कार्याची दखल श्रीक्षेत्र कळंब नगरीत घेण्यात येऊन त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे केपीएल स्पर्धेत दुसऱ्या क्रमाकांचं पुरस्कार त्यांच्या संघाने बिलाल ब्लास्टर (आदर्श संघाने) प्राप्त केले आहे.या पुरस्काराचे श्रेय आदर्श मंडळाच्या सर्व जेष्ठ सहकारी मित्रांना आणि ज्यांनी आदर्श मंडळाचा “आदर्श” घेऊन आजही क्रिकेट खेळाला जपणारे नवोदित खेळाडूंना जाते अशी भावना साप्ताहिक राळेगाव समाचार चे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान फिरोज लाखाणी यांनी आपली भावना पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली.
