
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्रच्या लेकीला राजस्थान येथील तिर्थांचा राजा जिथे प्रभु श्रीराम ने आपल्या नातेवाईकांना पिंड दान करुन मुक्त केले अर्थातच सर्वात मोठे आणि ब्रम्हाजींचे एकमेव तिर्थक्षेत्र पुष्कर येथे विदर्भातील सामाजिक कार्यकर्त्या ज्या स्वतः च्या समाजा सोबत ईतर ही समाजामध्ये महिलांसाठी सतत कार्य करत असतात.आमच्या भगिनी मैढ़ क्षत्रिय समाजातील सक्रिय महिला ज्या बायोडाटाच्या पॅनलला आपले वेळ देउन समाज कार्य करतात तसेच शिक्षणासाठी गरजु विद्यार्थ्यांना मदत करतात.जिल्हा यवतमाळ तालुका राळेगावच्या सौ.संतोषीताई राजजी सहदेव/वर्मा ह्यांची अखिल भारतीय मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला प्रकोष्ठ पंजीकृत दिल्ली S/20086 महाराष्ट्र राज्य अध्यक्षा म्हणुन निवड झाली होती. त्याच अनुषंगाने पुष्कर येथे समाजाचे पुष्कर भवन उद्घाटन झाले.त्या सोहळ्यात सौ.संतोषीताई सहदेव/वर्मा ह्यांना अहमदाबाद च्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.संगिताताई बुकन आणि महाराष्ट्रच्या नांदेड़ जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.दामोधरजी धुप्पड़/वर्मा,इ717च्या ट्रस्टी श्री.ब्रीजमोहनजी सहदेव/वर्मा ह्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवुन पुढील कारकिर्दीस भरभरुन शुभेच्छा देण्यात आले आहे.