निरंजन नलगे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा ढाणकी शहर सरचिटणीस पदी निवड

.
प्रतिनिधी::प्रवीण जोशी


भारतीय जनता पार्टीची विविध पदाची कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली त्यामधे निरंजन नलगे यांना युवा मोर्चा ढाणकी शहर मंडळाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. येणाऱ्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे ध्येय व धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहचून पक्ष संघटन मजबूत करू असे यावेळी निरंजन नलगे यांनी सांगितलं
तालुका संघचालक आनंदराव चंद्रे, ज्येष्ठ नेते प्रकाश जयस्वाल, पुसद जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष महामंत्री रोहित वर्मा, ढाणकी मंडळ शहर अध्यक्ष महेश पिंपरवार, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष बाळू योगेवार यांच्या मार्गदर्शनात ही नियुक्ती करण्यात आली.