
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मृत्यू हे या धर्तीवरचे अंतिम सत्य असून प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे हे शाश्वत सत्य जरी असलं ,तरी तो कधी व कसा येईल याचा मात्र नेम नाही, पण एखाद्याच्या अपघाती निधनाने मात्र संवेदनशील मणे हेलावल्या शिवाय राहत नाही याचीच प्रचिती काल राळेगावकरांना आली ,
अगदी लहान वयातच गायन, वादन, हार्मोनियम, तबला, ढोलकी ,आणि सुरेल बासरी वाजवून सर्वांना मोहित करणारा संजय आज आपल्यात नाही हे मान्य करायला कोणी तयार नाही, नेहमीप्रमाणे आपले कामे आटवून दिनांक 24! 4 !2024 ला यवतमाळ वडकी हायवेवर जात असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने घात केला गंभीर अवस्थेत संजय पोटफोडे याला यवतमाळ येथे रुग्णालय दाखल करण्यात आले दिवसभर मृत्यूची भांडणारा संजय मात्र रात्री साडेबारा वाजता मृत्यूची भांडता भांडता हरला आणि त्याची प्राणज्योत मालवली, बघता बघता ही बातमी सर्व राळेगावकरांना माहिती झाली आणि प्रत्येक घरातील मन हेलाऊन उठवले, ज्या वयात बापाचं सुख बघावं त्या वयात बापाचा मृतदेह पाहून संजय ची दोन्ही मुले रडताना पाहून हृदय पिटळून जात होते,
यवतमाळ वडकी राज्य महामार्ग 361 बी असून त्यापूर्वी सुद्धा वाहतुकीने भरधाव वाहतुकीने ,अवैध वाहतुकीने अनेक लोकांचे नाहक बळी गेले असून नवीन वस्तीतून हा महामार्ग अतिशय लहान व निमुळता झाला असून या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले आहे!
आज दिनांक 25 4 2024 ला दुपारी साडेबारा वाजता संजय पोटफोडे ची अंतिम यात्रा निघाली तेव्हा असंख्य लोकांची उपस्थिती ही त्याच्या कलाकारीची व कार्य तत्परतीची व सामाजिक कार्याची पावती म्हणावी लागेल.
अतिशय शोकाकुल वातावरणात त्याचे अंतिम संस्कार करण्यात आले व श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजलीपर अनेक मान्यवर उपस्थित होते माजी आमदार प्राध्यापक वसंत पुरके, नगरपंचायत राळेगाव उपाध्यक्ष, जानराव गिरी शहर काँग्रेस अध्यक्ष श्री प्रदीप ठूणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
