वरध गुरुदेव महाविद्यालयाचा 100%
निकाल

 

सहसंपादक : रामभाऊ भोयर

                       

आताच जाहीर झालेल्या HSC फेब्रुवारी 2024 निकालामध्ये श्री. गुरुदेव माध्य. व उच्च माध्यमिक शाखा कला महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. 12 वी कला शाखेत ३३ पैकी दोन विद्यार्थी डिस्ट्रिक्शन तर सात विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास होऊन महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. कला शाखेत प्रथम स्थान प्रीती विलास राठोड (78.33%) सानिया राजेंद्र दूधे (78.33%) तर द्वितीय स्थान राजकमल विश्वजीत कन्नाके (70.50%) तृतीय स्थान आचल सुभाष जाधव (67.50%) या विद्यार्थ्यांनी पटकावलेले आहे. आपल्या यशाचे श्रेय सर्व प्रथम आपल्या आई-वडिलांना व संस्थेचे अध्यक्ष श्री .किशोर पाटील झोटिंग (सर) व तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. एस.चिव्हाणे, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद श्री एस .टी . येडे, श्री जी. झेड वैद्य ,श्री एस .के .गेडाम प्रा. एस आर देशकर, प्रा. सी. एच दांडेकर, प्रा. ए. पी डंभारे, शिक्षकेत्तर कर्मचारी गलांडे बाबू दुर्गे सर , वाढोनकर, गेडाम ,गायकवाड यांना दिले. संस्थेचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.